कुप्रसिद्ध अंतरराष्टीय अपराधी दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचे दुसऱ्यांदा निलामी होणार आहे. विदेश मंत्रालयाने भारतात असलेल्या दाऊदच्या संपत्तीचे निलामी करण्यासाठी वर्तमान पत्रांमध्ये जाहिराती झळकल्या होत्या. हि निलामी १४ नोव्हेंबरला होणार आहे. ज्या ६ संपत्तीचे नीलमीकरण होणार त्यापैकी ३ दाऊदचे संपत्ती असून बाकी ३ त्याच्याशी निगडित लोकांची आहे. यापैकी अर्ध्याहून अधिक संपत्ती मुंबई मध्ये आहे तर एक फ्लॅट औरंगाबाद मध्ये आहे. सरकारने बेस प्राईज ५ लाख ठेवली आहे. निलामीमध्ये भाग घेणाऱ्या ग्राहकांनी आपली नाव नोंदणी व आपली माहिती संबंधित विभागाला १० नोव्हेंबर पर्यंत देणे बंधनकारात असणार आहे. यातल्या मुंबई मधील संपत्तीचे इन्सपेक्शन ७ नोव्हेंबरला होईल तर औरंगाबादमधील संपत्तीचे ३१ आक्टोबरला इन्सपेक्शन होईल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews